SetuCRM
SC/AFF/01 v1.0 · 10 Aug 2026

प्रतिज्ञापत्र अस्वीकरण

Affidavit Disclaimer

Setu CRM मधून मिळणारा दस्तऐवज हा केवळ मसुदा आहे. तो कायदेशीर होण्यासाठी काय करावं लागतं, हे इथे स्पष्ट केलं आहे.

A document produced by Setu CRM is a draft only. This page explains what still has to be done to make it legally effective.

थोडक्यात In short

आमचं software फक्त टंकलेखन आणि मांडणी करतं. योग्य मुद्रांक शुल्क भरून, सक्षम अधिकाऱ्यासमोर शपथ घेऊन आणि नोटरीकरण करूनच प्रतिज्ञापत्र वैध होतं. त्याआधी त्याला कोणतंही कायदेशीर मूल्य नाही.

Our software only types and formats the document. An affidavit becomes valid only after the correct stamp duty is paid and it is sworn and attested before a competent authority. Until then it has no legal effect.

०१

आम्ही वकील नाही

We are not advocates

SDS FINANCIAL ARCHITECTS ही वकिली संस्था नाही आणि Setu CRM वकिली सेवा पुरवत नाही. या सेवेच्या वापरातून तुमच्यात आणि आमच्यात वकील–अशील (attorney–client) संबंध निर्माण होत नाही.

आम्ही कोणत्याही स्वरूपाचा कायदेशीर सल्ला देत नाही — कोणतं प्रतिज्ञापत्र तुमच्या प्रकरणासाठी योग्य आहे, त्यात काय मजकूर असावा, किंवा त्याचे कायदेशीर परिणाम काय होतील, हे आम्ही सांगत नाही.

SDS FINANCIAL ARCHITECTS is not a law firm and Setu CRM does not provide legal services. Use of the Service does not create an attorney–client relationship between you and us.

We give no legal advice of any kind — we do not advise which affidavit suits your matter, what it should contain, or what its legal consequences will be.

०२

दस्तऐवज हा फक्त मसुदा आहे

The document is a draft only

Setu CRM तुम्ही भरलेली माहिती एका ठराविक नमुन्यात बसवून PDF तयार करतं. हा PDF म्हणजे तयार, अंमलात आलेलं प्रतिज्ञापत्र नव्हे. ते वैध होण्यासाठी:

  1. प्रकरणानुसार योग्य मूल्याच्या मुद्रांक कागदावर (stamp paper) ते छापावं लागतं
  2. प्रतिज्ञापत्रकर्त्याने ते स्वतः वाचून त्याची सत्यता पडताळावी लागते
  3. नोटरी, दंडाधिकारी किंवा शपथ आयुक्त यांच्यासमोर सही करून शपथ घ्यावी लागते
  4. संबंधित अधिकाऱ्याचा शिक्का आणि सही घ्यावी लागते

यापैकी कोणतीही पायरी Setu CRM करत नाही आणि करू शकत नाही.

Setu CRM places the information you enter into a standard format and produces a PDF. That PDF is not an executed affidavit. To become valid it must:

  1. be printed on stamp paper of the value applicable to the matter
  2. be read and verified as true by the deponent personally
  3. be signed and sworn before a notary, magistrate or oath commissioner
  4. bear the seal and signature of that authority

Setu CRM does not and cannot perform any of these steps.

०३

मुद्रांक शुल्क तुमची जबाबदारी

Stamp duty is your responsibility

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानुसार लागू होणारं मुद्रांक शुल्क ठरवणं आणि भरणं ही पूर्णपणे वापरकर्त्याची जबाबदारी आहे. सेवेत दाखवलेली मुद्रांक मूल्यं ही केवळ सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी आहेत; ती प्रत्येक प्रकरणाला लागू होतीलच असं नाही आणि नियम वेळोवेळी बदलतात.

चुकीच्या मूल्याच्या मुद्रांक कागदामुळे दस्तऐवज नाकारला गेल्यास त्याची जबाबदारी आमची नाही.

Determining and paying the stamp duty applicable under the Maharashtra Stamp Act is entirely the user's responsibility. Stamp values shown in the Service are general guidance only; they may not apply to your matter and the rules change from time to time.

We accept no responsibility where a document is rejected because it was executed on stamp paper of the wrong value.

०४

मजकुराची अचूकता तपासा

Check the content yourself

दस्तऐवजातील नावं, पत्ते, तारखा, रक्कम आणि सर्व तपशील तुम्ही भरलेल्या माहितीवरून तयार होतात. सही करण्यापूर्वी संपूर्ण मजकूर वाचून तपासण्याची जबाबदारी वापरकर्त्याची आहे.

देवनागरी मजकूर, जोडाक्षरं किंवा नावांचं लिप्यंतर यात तांत्रिक कारणांमुळे चूक होऊ शकते. छपाईपूर्वी PDF काळजीपूर्वक तपासा.

सेवेतील नमुने सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत. तुमच्या प्रकरणात विशेष परिस्थिती असेल, मालमत्ता किंवा वारसाहक्काचा विषय असेल, किंवा न्यायालयीन प्रकरण चालू असेल, तर वकिलाचा सल्ला घ्यावा.

Names, addresses, dates, amounts and all other particulars in the document are generated from the information you enter. It is your responsibility to read and verify the entire text before signing.

Devanagari text, conjunct characters or transliterated names may render incorrectly for technical reasons. Examine the PDF carefully before printing.

The templates in the Service are general in nature. Where your matter involves unusual circumstances, property or succession, or ongoing litigation, you should consult an advocate.

०५

खोटं प्रतिज्ञापत्र गुन्हा आहे

A false affidavit is an offence

इशारा Warning

शपथेवर खोटी माहिती देणं हा भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे. दस्तऐवजातील माहिती खरी आहे याची खात्री करणं ही केवळ प्रतिज्ञापत्रकर्त्याची जबाबदारी आहे. खोट्या माहितीच्या परिणामांची जबाबदारी Setu CRM किंवा SDS FINANCIAL ARCHITECTS यांच्यावर येत नाही.

Giving false information on oath is a punishable offence under the Bharatiya Nyaya Sanhita, 2023. Ensuring that the contents are true is the deponent's responsibility alone. Neither Setu CRM nor SDS FINANCIAL ARCHITECTS bears any responsibility for the consequences of false information.

०६

स्वीकृतीची हमी नाही

No guarantee of acceptance

कोणतंही शासकीय कार्यालय, न्यायालय, बँक, शाळा किंवा इतर संस्था हा दस्तऐवज स्वीकारेलच याची आम्ही हमी देत नाही. प्रत्येक प्राधिकरणाच्या स्वतःच्या आवश्यकता असतात आणि त्या बदलत राहतात.

दस्तऐवज नाकारला गेल्यास, विलंब झाल्यास किंवा त्यामुळे कोणतंही नुकसान झाल्यास आमची जबाबदारी अटी व शर्तींच्या कलम ११ नुसार मर्यादित राहील.

We do not guarantee that any government office, court, bank, school or other institution will accept the document. Each authority has its own requirements and these change over time.

Where a document is rejected or delayed, or loss results, our liability remains limited as set out in clause 11 of the Terms of Service.

०७

केंद्रचालकांसाठी

For centre operators

तुम्ही Setu / CSC केंद्रचालक असाल आणि ग्राहकासाठी दस्तऐवज तयार करत असाल, तर:

  • ग्राहकाची संमती घ्या आणि त्याची ओळख पडताळा
  • छपाईपूर्वी ग्राहकाला मजकूर वाचून दाखवा
  • हे अस्वीकरण ग्राहकाला समजावून सांगा
  • ग्राहकाच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता राखा

ग्राहकाशी असलेल्या तुमच्या व्यवहाराची जबाबदारी तुमची स्वतःची आहे.

If you are a Setu / CSC centre operator preparing a document for a customer, you must:

  • obtain the customer's consent and verify their identity
  • read the text back to the customer before printing
  • explain this disclaimer to the customer
  • keep the customer's personal information confidential

Your dealings with your customer are your own responsibility.

०८

दस्तऐवजांचं जतन

Retention of documents

तयार केलेल्या दस्तऐवजांचा तपशील सेवा चालवण्यासाठी आणि तुमच्या नोंदींसाठी साठवला जातो. तुम्ही sachin.satpute7@gmail.com वर विनंती करून तो हटवून घेऊ शकता. अधिक माहितीसाठी अटी व शर्ती कलम ०९ पहा.

Details of documents generated are retained to operate the Service and to maintain your records. You may request deletion by writing to sachin.satpute7@gmail.com. See clause 09 of the Terms of Service for more.